Sachin Tendulkar : `सचिनसोबत या टीमने कधीच.......` प्रसिद्ध खेळाडूचा मोठा खुलासा
`सर्वात ताकदवान टीमही सचिनसोबत.....`खेळाडूने अखेर तो मैदानावरचा `तो` किस्सा सांगितलाच
मुंबई : क्रिकेटमध्ये स्लेजिंग हा प्रकार काही नवीन राहीला नाही. आजकाल प्रत्येक सामन्यात स्लेजिंग होतेच. एखाद्या खेळाडूची विकेट काढण्यासाठी प्रतिस्पर्धी संघ अशी रणनीती आखत असतो. खेळाडूचं खेळावरील लक्ष विचलित करत त्याचा विकेट घेण्याचा हा प्रकार असतो. त्यामुळे एखाद्या खेळाडूची विकेट काढण्यासाठी असा प्रकार सर्रास मैदानावर पाहायला मिळतो. दरम्यान तुम्ही क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याच्यासोबत स्लेजिंग झाल्याचा किस्सा ऐकलाय का? नाही ना तोच जाणून घेऊयात.
सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) नोव्हेंबर 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध टेस्ट सामन्यात पदार्पण केले होते. त्यावेळी तो केवळ 16 वर्षांचा होता. इथून त्याने जी सुरूवात केली ती त्याने त्यानंतर 24 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर राज्य केले. 2013 मध्ये त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सचिनची (Sachin Tendulkar) ही कारकिर्द खुप मोठी आहे. या कारकिर्दीत त्याने अनेक दिग्गज बॉलर्सचा सामना केला. मात्र या बॉलर्ससमोर त्याने कधी गुडघे टेकले नाहीत. याउलट या बॉलर्सचा नेहमीच तो समाचार घेताना दिसला. आता राहीला प्रश्न स्लेजिंगचा, तर सचिनला ऑस्ट्रेलिया संघाने कधीच स्लेजिंग केली नाही. ती नेमकी ऑस्ट्रेलिया संघाने का केली नाही याचा खुलासा आता दिग्गज बॉलर ब्रेट लीने केला आहे.
विराट कोहलीला खुणावतायत दोन मोठे रेकॉर्ड, ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामन्यात मोठी संधी
'तो' किस्सा काय?
सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) त्याच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलिया सोबत अनेक सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये सचिनने चमकदार कामगिरी केली आहे. सचिन सोबत स्लेजिंग करण्याच्या घटनेवर बोलताना ब्रेट ली (Brett lee) म्हणालाय की, ऑस्ट्रेलियन संघाने कधीही तेंडुलकरवर स्लेजिंग केली नाही. कारण सचिन तेंडुलकर मैदानाबाहेर, मैदानात त्याच्या अगदी उलट असायचा असे तो म्हणालाय.
पुढे ब्रेट ली (Brett lee) म्हणाला, जेव्हा तुम्ही त्याला गोलंदाजी करता तेव्हा तुम्हाला तुम्ही सिंहाच्या डोळ्यात पाहत असल्यासारखे वाटते. यावेळी त्याच्या डोळ्यात पाहताना आपण त्याच्याशी लढावे अशी इच्छा होते. मात्र सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) फलंदाजी करत असताना त्याच्याशी बोलू नका असे आम्ही एकमेकांना नेहमी सल्ला द्यायचा, असे तो म्हणतो.
ब्रेट ली (Brett lee) पुढे म्हणतो, 'जर तुम्ही सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) स्लेज करण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्हाला माहीत आहे की तो नेहमी मैदानात उभा राहून तुमच्यासाठी अडचणी निर्माण करेल. म्हणून आम्ही कधी त्याला स्लेजिंग केली नसल्याचा खुलासा त्याने केला आहे.
दरम्यान सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि ब्रेट ली (Brett lee) मैदानात अनेक वेळा समोरासमोर आले होते, दोघांनी एकमेकांविरुद्ध अनेक वेळा यशही मिळवले. पण मैदानाबाहेर दोघांमध्ये खूप चांगले नाते होते. दोघांची खूप घट्ट मैत्री आहे आणि ती टीकून आहे.