मुंबई : गेल्या आयपीएलच्या सिझनमध्ये ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन आणि एडम झम्पा IPL सोडून गेले होते. याचा फटका लिलावात बसला असल्याचं केन रिचर्ड्सन याने स्वतः सांगितलंय. IPL मेगा ऑक्शनमध्ये या दोघांवरही कोणत्याही टीमने बोली लावली नाही. यानंतर केनने IPL टीम आणि म ओढलेत.


IPL मध्येच सोडून जाण्याची शिक्षा मिळाली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केन रिचर्डसन म्हणाला, गेल्या वर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे IPL स्थगित करण्यापूर्वीच सोडून मायदेशी परतल्याने आम्हाला यावर्षी मेगा ऑक्शनमध्ये कोणत्याही फ्रँचायसीने बोली लावली नाही. 


BCCI वर लावला मोठा आरोप


केन रिचर्ड्सन एडम झम्पावर कोणाही बोली लावली नाही या कारणामुळे हैराण झाला आहे. रिचर्डसन म्हणाला, एडमबाबत ऐकून मी जास्त हैराण झालो. खरं सांगायचं तर गेल्यावर्षी आयपीएल सोडून गेल्यावर त्याच्यासोबत झालेला संवाद आठवला.


त्यावेळी मी एडमला बोललो होतो की, आपल्याला याची किंमत मोजावी लागणार आहे. मात्र त्यावेळी आम्हाला त्याठिकाणी राहणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्हाला बोली न लागण्यामागे मला हेच कारण असल्याची शक्यता आहे, असं रिचर्डसनने सांगितलंय.