U-19 World Cup Final: ऑस्ट्रेलियाचं भारतापुढे 217 रनचं आव्हान
१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच कांगारुंना दणका देत सामन्यावर पकड मजबूत केली. ऑस्ट्रेलियाच्या झटपट तीन विकेट घेण्यात भारतीय टीमला यश आलं. ऑस्ट्रेलियन टीम 216 रनवर ऑलआऊट झाली आहे.
डरबन : १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच कांगारुंना दणका देत सामन्यावर पकड मजबूत केली. ऑस्ट्रेलियाच्या झटपट तीन विकेट घेण्यात भारतीय टीमला यश आलं. ऑस्ट्रेलियन टीम 216 रनवर ऑलआऊट झाली आहे.
216 रनवर ऑलआऊट
ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 216 रनवर ऑलआऊट झाला आहे. ऑस्ट्रेलियाकडून जॉनथन मेरलोने सर्वाधिक 76 रन केले. अनुकूल रॉयच्या बॉलवर शिवा सिंगने कॅच करत त्याला माघारी पाठवलं. त्यानंतर परम उपलने 34 रन केले. इतर ऑस्ट्रेलियाचे कोणतेही खेळाडू चांगले रन करु शकले नाही.
ईशान आणि कमलेशची कमाल
भारताकडून इशान पोरेल, शिवा सिंग, कमलेश नागरकोटी आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या तर शिवम मवीने 1 विकेट घेतली. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंचा संघ ऑस्ट्रेलियात विश्वचषक खेळत आहे. पाकिस्तानला धूळ चारत अंतिम फेरीत टीमने धडक मारली. नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियावर दबाव आणला. झटपट दोन फलंदाज बाद करत ईशान पोरेल आणि कमलेश नागरकोटीने कमाल करुन दाखवली. भारताकडून