मेलबर्न : भारताविरुद्धच्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी ऑस्ट्रेलियानं त्यांच्या टीमची घोषणा केली आहे. नेहमीच्या पद्धतीनं तसंच इतर देशांच्या टीम जशाप्रकारे टीमची घोषणा करतात तशी न करता यावेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं आगळी-वेगळी पद्धत अवलंबली आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून क्रिकेट ऑस्ट्रेलियानं त्यांच्या टीमची घोषणा केली आहे. या व्हिडिओमध्ये लहान मुलं क्रिकेट खेळताना दिसत आहेत. या मुलांच्या हातातील खेळाच्या साहित्यावरच निवड झालेल्या खेळाडूंची नावं घोषित करण्यात आली आहेत. क्रिकेट रसिकांनाही क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा हा टीम घोषित करण्याचा फंडा आवडला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्टसाठी ऑस्ट्रेलियानं १४ खेळाडूंची निवड केली आहे. २६ वर्षांचा मार्कस हॅरिस आणि २७ वर्षांच्या क्रिस ट्रीमॅनला पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीममध्ये संधी मिळाली आहे. बॅट्समन असलेल्या हॅरिसनं एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळलेली नाही. तर फास्ट बॉलर असलेल्या ट्रीमॅननं ४ वनडे खेळल्या आहेत.


हॅरिसनं यावर्षी शेफील्ड शिल्ड स्पर्धेमध्ये ८७.५० च्या सरासरीनं ४३७ रन केले आहेत. हॅरिसनं मागच्या महिन्यात न्यू साऊथ वेल्सविरुद्ध मेलबर्नमध्ये २५० रनची खेळी केली होती. तर ट्रीमॅननं मागच्या ४ प्रथम श्रेणी मॅचमध्ये तीन वेळा ५-५ विकेट घेतल्या आहेत. ६ डिसेंबरपासून या दोन्ही देशांमध्ये ऍडलेडमध्ये पहिली टेस्ट मॅच रंगेल.


ऑस्ट्रेलियाची टीम


टीम पेन(कर्णधार), मार्कस हॅरिस, एरॉन फिंच, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श(उपकर्णधार), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जॉस हेजलवूड(उपकर्णधार), नॅथन लॉयन, क्रिस ट्रीमॅन, पीटर सीडल, पीटर हॅण्ड्सकॉम्ब


भारताची टेस्ट टीम


विराट कोहली(कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत, पार्थिव पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार