T-20 World Cup 2022 ind vs Afg : अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या थरारक सामन्यात यजमानांनी निसटता विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या 169 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघ 164 धावापर्यंत मजल मारू शकला. अफगाणिस्तानने शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न केले मात्र अवघ्या चार धावांनी त्यांचा पराभव झाला. शेवटच्या षटकात 22 धावांची गरज असताना राशिद खानच्या तुफानी खेळीने ऑस्ट्रेलियाच्या संघाची धाकधूक वाढवली होती. शेवटी त्याचे प्रयत्नही अपूरे पडले. (Austrelia vs Afganistan T20 World cup 2022


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाची सुरूवात निराशाजनक केली होती, सलामीवीर ग्रीन आणि स्मिथ स्वस्तात माघारी परतले. मिचेल मार्शने आक्रमक फलंदाजी करत 30 चेंडूत 45 धावा केल्या त्यासोबतच ग्लेन मॅक्सवेलनेही 54 धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला 169 धावांचं लक्ष्य दिलं होतं. अफगाणिस्तानकडून नवीन-उल-हकने सर्वाधिक 3 गडी बाद केले.


अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाहने आक्रमक सुरूवात केली होती, त्याने अवघ्या 17 चेंडूत 30 धावा केल्या. इब्राहिम झदरान 26 धावा, गुलाबदिन नईब 39 धावा केल्या. कर्णधार मोहम्मद नबी 1 धावेवर बाद झाला, हेजलवूडने त्याला बाद केलं. शेवटच्या काही षटकांमध्ये 50 पेक्षा धावांची गरज होती. त्यावेळी राशिद खानने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना फोडून काढत संपूर्ण संघाला घाम फोडला. 23 चेंडूत राशिदने 48 धावांची खेळी केली यामध्ये 4 सिक्स आणि 3 चौकारांचा समावेश आहे.