अॅडलेड : दुसऱ्या अॅशेस टेस्टमध्ये इंग्लंडचा 120 रन्सनी पराभव झाला आहे. याचबरोबर ऑस्ट्रेलियानं अॅशेस सीरिजमध्ये 2-0नं आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियानं ठेवलेल्या 354 रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची टीम 233 रन्सवर ऑल आऊट झाली. इंग्लंडकडून जो रुटनं सर्वाधिक 67 रन्स केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेवटच्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कनं सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तर हेझलवूड आणि लायनला प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या. पॅट कमिन्सला एक विकेट घेण्यात यश आलं.


ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये 442 रन्स केल्यानंतर इंग्लंडला 227 रन्सपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 215 रन्सचा लीड मिळाला. पण मॅचच्या तिसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडच्या बॉलर्सनी कमबॅक केलं आणि ऑस्ट्रेलियाला 138 रन्सवर ऑल आऊट केलं.


इंग्लंडच्या जेम्स अंडरसननं पाच विकेट घेतल्या. तर क्रिस वोक्सला 4 आणि ओव्हरटनला एक विकेट घेण्यात यश आलं. या सीरिजच्या पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं इंग्लंडवर 10 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला होता.