IND W vs AUS W :  महिला क्रिकेटमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सनी राखून पराभव केला आहे. भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच कसोटीत पराभूत करून 10 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाच्या नांग्या ठेचल्या. या सामन्यात अनेक इतिहास देखील रचले गेले. इंग्लंडपाठोपाठ आता ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी देखील जिंकली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडने विजयाची दशमी साजरी केली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने पराभव करत टीम इंडियाने उत्सव साजरा केला. मात्र, या सर्वात ऑस्ट्रेलियाची कॅप्टन अ‍ॅलिसा हिली (Alyssa Healy) हिने सर्वांचं काळीज जिंकलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने विजयानंतर जंगी सेलिब्रेशन केलं. हरमनप्रीत अँड कंपनीने (Harmanpreet Kaur) मुंबईकरांचे आभार मानले आणि ट्रॉफी उचलली. त्याचवेळी अ‍ॅलिसा हिली मैदानात आली. त्यावेळी तिच्या हातात कॅमेरा होता. टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयाची फोटो अ‍ॅलिसा हिली हिने तिच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. अ‍ॅलिसा हिली हिच्या या कृतीने सर्वांना भावूक (Alyssa Healy Wins Hearts with camera) केलं. ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला नाही पण काळीज जिंकलं, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. 


पाहा Video



दरम्यान, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 219 धावांना प्रत्युत्तर देताना भारताने पहिल्या डावात 406 धावा केल्या आणि 187 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 261 धावा उभारल्या होत्या. त्यामुळे भारताचा विजय सोप्पा झाला होता.


ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मूनी, फोईब लिचफील्ड, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा, एलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), एनाबेल सुथरलँड, एशले गार्डनर, जेस जोनासेन, एलाना किंग, किम गर्थ, लॉरेन चीटल.


भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (डब्ल्यू), रिचा घोष, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग, राजेश्वरी गायकवाड.