मेलबर्न : भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याची हंगेरीची जोडीदार टिमिया बाबोस यांनी ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय.


मिश्र दुहेरीत 7-5, 5-7(10-6) ने विजय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिश्र दुहेरीत या जोडीने सेमीफायनलमध्ये स्पेनच्या मारिया जोस मार्टिनेज सांचेज आणि ब्राझीलच्या मार्सेलो डेमोलिनेरला 7-5, 5-7(10-6) असे पराभूत केले. 


हा सामना तब्बल एक तास 25 मिनिटे रंगरला. फायनलमध्ये बोपण्णा-बाबोसचा मुकाबला कॅनडाच्या गॅब्रिएला डेब्रोस्की आणि क्रोएशियाच्या मॅट पाविकशी रंगणार आहे. 


सेमीफायनलमधील विजयासह बोपण्णा दुसऱे ग्रँडस्लॅम मिळवण्याच्या एक पाऊल दूर आहे. 37 वर्षीय बोपण्णाने गेल्या वर्षी कॅनडाच्या गॅब्रिएला डॅब्रोवस्कीह फ्रेंच ओपनमध्ये मिश्र दुहेरीचे जेतेपद मिळवले होते. बोपण्णाच्या रुपाने भारताचे या स्पर्धेतील आव्हान कायम आहे.