केपटाऊन : द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात बॉल कुरतडल्याप्रकरणी मंगळवारी द. आफ्रिकेत आपातकालीन बैठक होणार आहे. या बैठकीत कोच डॅरेन लेहमन आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या भविष्याचा निर्णय होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदलँड यांच्यावर कारवाईसाठी मोठा दबाव आहे. कारण बॉल टेंपरिंग प्रकरणावरुन ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सवर चहूबाजूंनी टीका होते. ऑस्ट्रेलियन मीडियाने तर हे प्रकरण म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीला काळिमा असल्याचे म्हटलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार, जेम्स सदरलँड स्मिथ आणि उपकर्णधार डेविड वॉर्नरवर १२ महिन्यांची बंदी घालून त्यांना मायदेशी पाठवू शकतात. सध्या स्मिथवर एका सामन्याची बंदी घातलीये. स्मिथचा सहकारी कॅमेरन बेनक्राफ्टला सामन्यादरम्यान बॉलशी छेडछाड करताना पाहिले गेले होते. याचाच अर्थ स्मिथ जोहान्सबर्गमध्ये सुरु होणाऱ्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाहीत. लेहमन यांनी तर या प्रकरणावर अद्याप कोणतेही विधान केलेले नाहीये. २०१३मध्ये लेहमन यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले होते. 


हे आहे प्रकरण


द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात केपटाऊन येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीदरम्यान ही घटना घडली. आफ्रिका फलंदाजी करत होत. ३४वे षटक सुरु होती. यावेळी मार्करम आणि एबी डे विलियर्स खेळत होते. त्याचवेळी बेनक्राफ्ट एका चिपसारख्या वस्तूसकट कॅमेऱ्यात कैद झाला. सुरुवातीला ही बॉल चमकवण्यासाठी चिप असल्याचे सांगितले गेले. त्याने ती चिप बॉलवर घासली. दरम्यान, यावेळी अंपायरने बेनक्राफ्टला हटकले. तसेच अंपायरसमोर येण्यासाठी बेनक्राफ्टने पिवळ्या रंगाची वस्तू अंतवस्त्रात ठेवताना अंपायरने पाहिले होते. जेव्हा अंपायर त्याच्याकडे पोहोचले तेव्हा त्यांनी ब्रेनकाफ्टच्या पँटचा खिसा चेक करुन पाहिला. यावेळी खिशात अनेक वस्तू होत्या. 
 
यानंतर कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि बेनक्राफ्टने याप्रकरणी आपली चूक मान्य केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्मिथने बॉल टेंपरिंगचे प्रकरणाची जबाबदारी घेतली. तसेच बेनक्राफ्टनेही बॉल टेंपरिंग केल्याचे मान्य केले. 


ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली नाराजी


ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या या वर्तनामुळे ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनीही नाराजी व्यक्त केलीये. ही शरमेची घटना असल्याचे पंतप्रधान मेल्कोन टर्नबुल यांनी म्हटलंय.