मुंबई : पुष्पाने सिनेमाने (Pushpa The Rise) बॉक्स ऑफिससोबतच सोशल मीडियावर धिंगाणा घातलाय. जो तो 'पुष्पा' सिनेमातील डॉयलॉगवर रील बनवतोय तर कोणी व्हीडिओ करतोय. पुष्पाच्या डॉयलॉगवर आणि पुष्पराजसारखा लूक ठेवण्याचा मोह अनेकांना आवरता आलेला नाही. या पुष्पाची लोकप्रियता आता सातासमुद्रापार गेली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार ओपनर बॅट्समन डेव्हिड वॉर्नरने (David Warner Pushparaj) पुष्पाच्या फेमस डॉयलॉगची कॉपी केली आहे. (australia star cricketer david warner makes video on south actor allu arjun pushpa raj dialogue)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वॉर्नरने शेअर केलेला व्हीडिओला चाहत्यांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. वॉर्नर या व्हीडिओत अल्लू अर्जूनचा एक डॉयलॉग बोलताना दिसतोय. वॉर्नरच्या या व्हीडिओला आतापर्यंत एकूण 7 मिलियन लाईक आहेत. तर 70 हजारांपेक्षा अधिक कमेंट्स करण्यात आल्या आहेत. वॉर्नर हा व्हीडिओ 30 डिसेंबरला शेअर केला होता.  


दरम्यान वॉर्नरने असे व्हीडिओ  सोशल मीडियावर शेअर करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही वॉर्नरने अनेकदा हिंदी सिनेमातील डॉयलॉगव लिपसिंक व्हीडिओ शेअर केले आहेत.