पेशावरमध्ये आत्मघातकी हल्ला, ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटूंमध्ये भीतीचं वातावरण
पाकिस्तानातील पेशावरमध्ये (Peshawar) आत्मघातकी हल्ला झाला. नमाज पठण सुरु असतानाच मशिदीत हा स्फोट झाला. यात 55 लोकांचा मृत्यू झालायं तर 100 हून अधिक जखमी झालेत.
इस्लामाबाद : पाकिस्तानातील पेशावरमध्ये आत्मघातकी हल्ला झाला. नमाज पठण सुरु असतानाच मशिदीत हा स्फोट झाला. यात 55 लोकांचा मृत्यू झालायं तर 100 हून अधिक जखमी झालेत.जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. भयंकर स्फोटानंतर पोलिसांनी तपास सुरु केलाय. हा आत्मघातकी हल्ला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. कोचा रिसालदार परिसरातील मशिदीत शुक्रवारचं नमाज पठण सुरु होतं. यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हल्लेखोरांनी पोलिसांना गोळ्या घालून मशिदीत प्रवेश केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीये. (australia tour pakistan 2022 aussies cricketer in danger due to bomb explodes at mosque in northwestern city of peshawar)
पेशावरमधील हल्ल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. कारण इस्लामाबादेत पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरिज सुरू आहे. आता या बॉम्बस्फोमुळे ऑस्ट्रेलियाची टीम पाकिस्तान दौरा सोडून जाण्याची शक्यता आहे. तब्बल 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर (Australia Tour Pakistan 2022) आलाय. मात्र हा दौरा रद्द होण्याची भीती व्यक्त होतेय.