गुवाहाटी : भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या सीरिजमध्ये भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. आज या सीरिजमधील दुसरा सामना खेळला जात आहे. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला असून त्यांनी प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलियासमोर मोठा स्कोर उभा करण्याची संधी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ९ विकेटने मात दिली होती. आता भारत दुस-या सामन्यातही ऑस्ट्रेलियाला धुळ चारण्याच्या अपेक्षेनेच मैदानात उतरणार आहे. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने डकवर्थ लुईस नियमाने भारताला ६ ओव्हरमध्ये ४८ रन्स काढायचे होते. भारताने सहजच हा स्कोर पूर्ण केला. त्याआधी ऑस्ट्रेलियाने बॅटींग करत १८.४ ओव्हर्समध्ये विकेट गमावून ११८ रन्स केले होते. 



आता भारत गुवाहाटीमध्ये होत असलेल्या टी-२० सामन्यात विजयासाठी अपेक्षेनेच खेळेल. आजच्या सामन्याची मोठी जबाबदारी ही कर्णधार विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्र सिंह धोनी यांच्यावर असेल. तर मधल्या फळतील जबाबदारी मनीष पांडे, केदार जाधव आणि हार्दिक पंड्याकडे असेल. 


टीम :


टीम इंडिया : विराट कोहली(कर्णधार), महेंद्र सिंह धोनी, रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, मनीष पांडे, केदार जाधव, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, आशीष नेहरा, लोकेश राहुल आणि अक्षर पटेल.


ऑस्ट्रेलिया : डेविड वॉर्नर (कर्णधार), मोएजिज हेनरिक्स, एरॉन फिंच, टिम पेन , डेनियल क्रिस्टियन, ग्लेन मैक्सवेल, जेसन बेहेरेन्डॉर्फ, नाथन कूल्टर-नाइल, ट्रेविस हेड, एडम जाम्पा, एंड्रयू टाइ, केन रिचर्डसन.