अबब ! Andrew Symonds ची उत्पन्न माहितीय का ? आकडा एकूण चक्कर येईल
देशांतर्गत सामने तसेच विश्वचषक आणि आयपीएलमधून मोठी कमाई केली.
मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) याचे अपघाती निधन झाल्याची घटना घडलीय. या घटनेने क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरलीय. या निधनाच्या घटनेनंतर त्याच्या आयुष्यातील विविध पैलू समोर येत आहेत.दारूचे व्यसन, असभ्य टीका, खेळाडूंसोबतचे वाद अशा सर्व गोष्टी माध्यमांतून पुढे आल्या आहेत. त्यात आता अँड्र्यू सायमंड्सच महिन्याचे उत्पन्न माहितीय का ? असे प्रश्न समोर येत आहेत. तर जाणून घेऊयात त्याच्या उत्पनाचा स्त्रोत आणि उत्पन्न.
उत्पन्नाचा स्त्रोत
अँड्र्यू सायमंड्सचा (Andrew Symonds) उत्पन्नाचा प्रमूख स्त्रोत क्रिकेट होता. त्याने देशांतर्गत सामने तसेच विश्वचषक आणि आयपीएलमधून मोठी कमाई केली. अँड्र्यू सायमंड्सने २०१२ साली क्रिकेटला अलविदा केला. सायमंड्स महिन्याला 40 हजार डॉलर्स कमवायचा. तर त्याच वेळी त्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाख डॉलर होते.भारतीय रुपयांमध्ये म्हटलं तर सायमंड्स 38 कोटी 74 लाख उत्पन्न होते.
अँड्र्यू सायमंड्सचा (Andrew Symonds) शनिवारी रात्री कार अपघात झाला. या कार अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. क्वीन्सलँडच्या टाऊन्सविले इथे ४६ वर्षीय सायमंड्सच्या कारला अपघात झाला होता. सायमंड्सच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात आणि त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.