मुंबई : क्रिकेट विश्वात सध्या 2 फलंदाजांची जोरदार चर्चा आहे. एक टीम इंडियाचा विराट कोहली (Virat Kohli) आणि दुसर पाकिस्तानचा कॅप्टन (Babar Azam)  बाबर आझम. सध्या विराटला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता येत नाहीये. मात्र विराटने अनेक रेकॉर्ड केले आहेत. तर बाबर गेल्या काही काळापासून सातत्याने शानदार कामगिरी करतोय. बाबरने नुकत्याच पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 196 धावांची खेळी केली. दोघांमध्ये अटीतटीची स्पर्धा पाहायला मिळतेय. त्यामुळे या दोघांपैकी सर्वोत्तम कोण, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. या दोघांपैकी बेस्ट कोण याबाबत ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर पॅट कमिन्सने प्रतिक्रिया दिली आहे. (australian cricketer pat cummins give answer who is best on between virat kohli and babar azam) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॅट काय म्हणाला?


बाबरची नेहमीच विराटसोबत तुलना केली जाते. या दोघांच्या तुलनेबाबत पॅटने प्रतिक्रिया दिली. "त्या दोघांचा फलंदाजाचा पिंड आहे. ते कोणत्याही फॉर्मेटमध्ये तुमच्यासमोर नेहमीच आव्हान उभं करतील. दोघेही शानदार क्रिकेटर आहेत. दोघांनीही ऑस्ट्रेलिया विरुद्ध अनेकदा शतकी खेळी केली आहे", अशी प्रतिक्रिया पॅटने दिली.


विराट आणि बाबरची क्रिकेट कारकिर्द


विराटने 101 कसोटी, 260 एकदिवसीय आणि 97 टी 20 सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. विराटने  या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 8 हजार 43, 12 हजार 311 आणि 3 हजार 296 धावा कुटल्या आहेत. 


तर बाबर पाकिस्तानकडून 39 टेस्ट, 83 वनडे आणि 73 टी 20 मॅचमध्ये खेळला आहे. बाबरने या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 2 हजार 729, 3 हजार 985 आणि 2 हजार 620 धावा केल्या आहेत.