Australia vs Pakistan, 1st Test : सध्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जातोय. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने गुरुवारी पाकिस्तानविरुद्ध पर्थ स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात स्फोटक शतक (David Warner Century) ठोकून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात डेव्हिड वॉर्नर याने 164 धावांची खेळी करून मिशेल जॉन्सन याला जोरदार सडकून उत्तर दिलं आहे. या सामन्यात डेव्हिड वॉर्नर याने अनेक विक्रमाची मोडतोड केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रायन लाराचा रेकॉर्ड मोडला


पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत डेव्हिड वॉर्नर आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. डेव्हिड वॉर्नरने ब्रायन लाराचा पाकिस्तानविरुद्ध 47 व्या डावात दहावं शतक झळकावून विक्रम मोडला. ब्रायन लाराने पाकिस्तानविरुद्ध 70 डावात 9 आंतरराष्ट्रीय शतकं झळकावली होती. या यादीत कुमार संगकारा 12 शतकांसह पहिल्या स्थानावर आहे. कुमारा संगाकाराने यासाठी 108 इनिंग खेळल्या तर अरविंद डी सिल्वाने 111 इनिंगमध्ये 11 शतक झळकावले आहेत.



दरम्यान, ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात आत्तापर्यंत 346 धावा उभारल्या होत्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून संपूर्ण दिवसावर डेव्हिड वॉर्नरने हुकूमत गाजवली. त्या व्यतिरिक्त उस्मान ख्वाजा याने 41 धावा तर ट्रेविस हेडने 40 धावांची खेळई केली. 


आणखी वाचा - IPL 2024 : ऑक्शनपूर्वी शाहरूख खानचा तडकाफडकी निर्णय, नितीश राणाला डच्चू देत 'या' खेळाडूला केलं कॅप्टन!


पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन) : अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, सरफराज अहमद (यष्टीरक्षक), आगा सलमान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, आमेर जमाल, खुर्रम शहजाद.


ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड.