नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा पत्रकार डेनिस फ्रिडमॅन याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याला चिमटा काढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेनिसला एक ट्विट करून दर्शवायचे आहे की, विराट कोहली पाकिस्तानच्या बॉलर मोहम्मद आमिरला घाबरतो. त्याने ट्विटमध्ये लिहिले की, ‘जेव्हा तू बॅटींगसाठी बाहेर येतो आणि पाहतो की आमिरच्या हातात बॉल आहे’. यासोबत डेनिसने एक विराटचा एक फोटोही शेअर केलाय. ज्यात विराटचे हावभाव धक्का बसल्यासारखे दिसत आहे. या ट्विटमुळे विराटचे फॅन चांगलेच भडकले आहेत.  



आमिरने जुलैमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान दमदार बॉलिंगचे प्रदर्शन केले होते. त्याने विराटची विकेट घेतली होती. मैदानात दोघांचे नाते कसेही असो पण मैदानाबाहेर दोघे खूप चांगले मित्र आहेत. दोघेही ऎकमेकांचं नेहमीच कौतुक करत असतात. 


विराट म्हणाला होता की, आमिरच्या इन-स्विंग आणि आऊट-स्विंग करण्याच्या त्याच्या शैलीने प्रभावित आहे. त्याने हेही म्हटले होते की, आमिरवर जर बॅन आला नसता तर आज जगातल्या तीन दिग्गज बॉलरमध्ये तो राहिला असता. तेच ट्विटरवर एका फॅनने आमिरला विचारले होते की, तुझ्या मते जगातल सर्वश्रेष्ठ बॅट्समन कोण आहे? यावर त्याने विराट कोहली असे उत्तर दिले होते. 


हे पहिल्यांदाच नाहीये की, लोकप्रियता मिळवण्यासाठी डेनिसने अशी पोस्ट केली. त्याने याआधीही विराट कोहलीचा स्टेडियममध्ये झाडू मारतानाचा फोटो शेअर केला होता.