IND vs AUS : कांगारूंचा पुन्हा रडीचा डाव? Shreyas Iyer च्या विकेटवरून का होतोय मोठा वाद?
तिसऱ्या टेस्ट सामन्यातील भारताच्या पहिल्या डावात टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यरला भोपळाही फोडता आला नाही. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer bowled) क्लिन बोल्ड आऊट झाला. मात्र त्याच्या विकेटवरून आता मोठा गदारोळ माजला आहे.
Shreyas Iyer bowled: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे (Border–Gavaskar Trophy) सुरु आहे. या सिरीजमध्ये टीम इंडियाने यापूर्वीच 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया (Team India) ढेपाळलेली दिसली. तिसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये खेळवला जातोय. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडिया फलंदाजी करत असताना एक मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. हा मुद्दा आहे तो श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) च्या विकेटसंदर्भात.
तिसऱ्या टेस्ट सामन्यातील भारताच्या पहिल्या डावात टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यरला भोपळाही फोडता आला नाही. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer bowled) क्लिन बोल्ड आऊट झाला. मात्र त्याच्या विकेटवरून आता मोठा गदारोळ माजला आहे. त्याच्या विकेटचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावेळी भारतीय चाहते, ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा चिडीचा डाव खेळत असल्याची टीका करतायत.
Shreyas Iyer खरंच आऊट की नॉट आऊट?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रोमांचक सामना रंगला आहे. या सामन्यात अवघ्या 109 रन्सवर टीम इंडियाचा ऑल आऊट झाला. दरम्यान 50 पेक्षाही कमी रन्समध्ये टीम इंडियाने 5 विकेट्स गमावले होते. यावेळी जडेजाची विकेट गेल्यानंतर श्रेयस अय्यरचीही विकेट गेली. ज्याचा व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये 12 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer bowled) क्लीन बोल्ड आऊट झाला.
कांगारूंचा चिडीचा डाव?
झालं असं की, श्रेयस कुहनेमॅनच्या बॉलला ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न करतो. यावेळी बॉल टर्न होऊन जमिनीवर आपटतो आणि विकेटला जाऊन आदळतो. मात्र यावेळी चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, हा बॉल पहिल्यांदा विकेटला लागला त्यानंतर विकेटकीपरच्या पॅड्सना लागून तो स्टंपवर लागला. याशिवाय नॉन स्ट्रायकर एंडला उभा असलेला विराट देखील हे दृश्य पाहून कन्फ्यूज झालेला दिसतोय.
टीम इंडियाचे फलंदाज ठरले फ्लॉप
रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताचे फलंदाज फ्लॉप गेले. टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला 30 पेक्षा अधिक रन्स करता आले नाहीत. यावेळी विराटने सर्वाधिक म्हणजेच 22 रन्स केले. त्यानंतर शुभमन गिलने 21 रन्सची खेळी केली. रोहित शर्मा 12, भरत 17 तर अक्षर पटेल 12 रन्सवर पव्हेलियनमध्ये परतले. कांगारूंच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.