मुंबई: देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. क्रिकेट विश्वावरही कोरोनाचं मोठं संकट असताना सर्व काळजी घेऊन सध्या IPL 2021 सुरू आहे. या IPLमध्ये तीन विदेशी खेळाडूंनी माघार घेतली असून ते मायदेशी परतले आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया-भारत विमान प्रवास करण्यावर निर्बंध आले आहेत. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आता हैदराबाद संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि राजस्थान संघातील स्टिव स्मिथ देखील IPLमधून माघार घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. तर दुसरीकडे IPL नियोजित वेळेनुसार सुरू राहिल असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील केन रिचर्डसनस आणि एडम झम्‍पा तर राजस्थान रॉयल्स संघातील एन्ड्रयू टाय स्वदेशी परतले आहेत. त्यांनी IPLमधून माघार घेतली आहे. देशात वाढत्या कोरोनामुळे त्यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. 


ऑस्ट्रेलिया खेळाडूंनी बयोबबलचं अत्यंत काटेकोरपणे पालन केलं आहे. दुसरं म्हणजे ऑस्ट्रेलियात एन्ट्री बंद होण्याची भीती देखील IPLमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंना धास्तावत आहे. त्यामुळे त्यांनी ऑस्ट्रेलियन बोर्डाकडे IPL संपल्यानंतर विमानाची व्यवस्था करण्याची विनंती देखील केली आहे. 


दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा स्टार बॉलर पॅट कमिन्सने भारतीयांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कमिन्स याने पीएम केअर फंडमध्ये 50,000 डॉलर देण्याची कोलकाता सामन्यापूर्वी घोषणा केली होती. ज्यामुळे या खेळाडूचं खूप कौतुक होत आहे. तर भारतीयांनी सोशल मीडियावरून त्याचे आभार देखील मानले आहेत.