IND vs Aus : झटपट विकेट्स गेल्याने कांगारू झाले हैराण; इनिंग्स ब्रेकमध्ये केलं लज्जास्पद कृत्य!
9 फेब्रुवारीपासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला सामना खेळवला जातोय. ऑस्ट्रेलियाच्या टीमने प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र ऑस्ट्रेलिया कर्णधाराचा हा निर्णय फेल गेला.
India vs Australia 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया ( India vs Australia ) यांच्यामध्ये 4 सामन्यांच्या सिरीजला सुरुवात झाली आहे. सिरीजचा पहिला सामना गुरुवारी नागपूरमध्ये खेळवला गेला असून कांगारूंच्या फलंदाजांची चांगलीच नाचक्की झाली. अवघ्या 177 रन्सवर ऑस्ट्रेलिया टीमचा (Australia team) ऑलआऊट झाला. टी ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाची टीम 8 विकेट्स गमावत 174 रन्सवर होती. दरम्यान इतक्या लवकर विकेट्स जात असल्याचं लक्षात येताच ऑस्ट्रेलिया टीमने एक विचित्र कृत्य केलंय. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral Video) होतंय.
9 फेब्रुवारीपासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला सामना खेळवला जातोय. ऑस्ट्रेलियाच्या टीमने प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र ऑस्ट्रेलिया कर्णधाराचा हा निर्णय फेल गेला. ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.
पीचची पाहणी करण्यासाठी मैदानावर धडकली ऑस्ट्रेलिया टीम
मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, हँडसकॉम्ब आणि एलेक्स कॅरी यांच्याशिवाय कोणत्याच फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाहीये. सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाची टीमचा ऑल आऊट झाला. अगदी कमी अंतरामध्ये विकेट्स जात असल्याने ऑस्ट्रेलिया टीम हैराण झाली. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये पीचची पडताळणी करण्यासाठी टीमसह सपोर्ट स्टाफ मैदानात उतरली. दरम्यान याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
भारतीय गोलंदाजांची कमाल
कॅप्टन पॅट कमिन्सचा (Pat Cummins) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फेल ठरला. सुरूवातीला रोहितने मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि सिराजच्या (Mohammed Siraj) हातात बॉल सोपवला. त्याचं फळ टीम इंडियाला मिळालं. 2 धावांच्या स्कोअरवर कांगारू संघाला पहिला धक्का बसला. उस्मान ख्वाजा तीन चेंडूत एक धाव काढून बाद झाला. ऑस्ट्रेलियाने 15 षटकांत 2 गडी गमावून 36 धावा केल्या होत्या. त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला मैदानात टिकता आलं नाही.
दोन्ही संघाची प्लेइंग XI
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (क), नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्कॉट बोलँड.