मुंबई: टीम इंडियाची सीनियर टीम इंग्लंड दौऱ्यावर आहे. कर्णधार विराट कोहलीला तिसरा मोठा धक्का लागणार आहे. याचं कारण म्हणजे आता वॉशिंग्टन सुंदर आणि फास्ट बॉलर सीरिजमधून बाहेर जाण्याची शक्यता आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड 4 ऑगस्टपासून 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या सीरिजपूर्वी 5 खेळाडू जखमी झाले आहेत. त्यापैकी शुभमन गिल तर सीरिजमधून बाहेर पडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीच्या पाठीला दुखापत झाली आहे. अजिंक्य रहाणेचा पाय सुजला आहे. दुसरीकडे सराव सामन्या दरम्यान वॉशिंग्टन सुंदर जखमी झाला आहे. तर टीम इंडियाचा फास्ट बॉलर आवेश खानच्या बोटाला सरावा दरम्यान दुखापत झाली आहे. आवेश खानच्या बोटाची दुखापत गंभीर आहे. त्याचा एक्सरे देखील काढण्यात आला आहे.


बीसीसआय अधिकाऱ्यांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अवेश खानच्या बोटाला झालेली दुखापत गंभीर असल्याने तो सीरिजमधून बाहेर जाण्याची शक्यता आहे. सध्या मेडिकल टीम त्याच्या सोबत असून त्याचे हेल्थ अपडेट घेत आहे. 


ऋषभ पंतची दुसऱ्यांचा कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऋषभ पंत आता सरावासाठी मैदानात उतरणार आहे. बीसीसीआयने त्याच्या फोटो शेअर केला आहे. 


इंग्लंडने जाहीर केला आपला संघ


जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रॉली, सॅम कुर्रान, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, डॉम सिब्ले, बेन स्टोक्स , मार्क वुड. अशी 17 जणांची टीम जाहीर करण्यात आली आहे. 4 ऑगस्टपासून टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.