Ayush Badoni flying kiss: मोहालीच्या मैदानावर आयपीएल 2023 मधील 46 वा सामना लखनऊ सुपर जायन्ट्स आणि चेन्नई (Lucknow Super Giants vs Chennai Super Kings) यांच्यात खेळवण्यात आला होता. मात्र, पावसामुळे या सामना व्यर्थ गेल्याचं पहायला मिळतंय. चेन्नई सुपर किंग्सचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पावसामुळे टॉस 3:30 वाजता झाला तर, सामना सुरू होण्यास 3:45 वाजले. त्यामुळे सामना अधिक रोमांचक होईल, अशी परिस्थिती होती. मात्र, प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनऊच्या (LSG) फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोईन अली, महेश तिक्ष्णा आणि रवींद्र जडेजा या तिन्ही फिरकीपटूंनी जोरदार कामगिरी करत लखनऊला गुडघ्यावर आणलं. नियमित कर्णधार केएल राहुलच्या जागी कृणाल पांड्या (Krunal Pandya) सामन्याचं नेतृत्व करत होता. मात्र, त्याला खास कामगिरी करता आली नाही. तो शुन्यावर बाद झाला. एकीकडे लखनऊ बॅकफूटवर जात असताना मैदानात टिकून राहिला तो आयुश बदोनी (Ayush Badoni). बदोनीने एकहाती 59 धावांची खेळी केली. त्यावेळी मैदानात त्याचं नवं रुप पहायला मिळालं. (Ayush Badoni gave flying kiss in LIVE LSG vs CSK match MS Dhoni also kept watching Watch video)


सीएसकेचा फिरकीपटू महेश तिक्ष्णावर त्याने (Ayush Badoni) जोरदार हल्लाबोल केला. उजव्या हाताच्या फलंदाजाने गुडघ्यावर बसून ऑफस्पिनरला दे दणा दण फटकेबाजी केली. बडोनीने दीपक चहरच्या बॉलवर चौकार खेचून फक्त 30 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. त्याचवेळी त्याने सर्वांसमोर प्रेक्षकांना फ्लाईंग किस्स (flying kiss) दिली. त्याचा एक व्हिडीओ व्हारयल (Viral Video) झाला आहे. त्यावेळी धोनी देखील त्याचं सेलिब्रेशन (Ayush Badoni Celebration) पाहतच राहिला. 


पाहा Video 



दरम्यान, आयुश बदोनी याने सेम टू सेम विराट कोहलीच्या (Virat Kohli) स्टाईलने सेलिब्रेशन केलं. त्यामुळे आता बदोनी टीम इंडियाचा नवा विराट होऊ पाहतोय का? असा सवाल आता विचारला जातोय. दरम्यान, हा सामना पावसामुळे वाया गेला मात्र, बदोनीचं कर्तृत्व मात्र लपून राहिलं नाही.


चेन्नई सुपर किंग्स: डेवोन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड़, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार /विकेटकीपर), दीपक चाहर, तुषार देशपांडे, मथीषा पथिराना, महेश तीक्ष्णा.


लखनऊ सुपर जाएंट्स : काइल मेयर्स, मनन वोहरा, कर्ण शर्मा, आयुष बदोनी, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), क्रुणाल पांड्या (कर्णधार), कृष्णप्पा गौतम, नवीन-उल-हक, रवि बिश्नोई, मोहसिन खान.