Babar Azam : पाकिस्तानचा विराट कोहली म्हटल्या जाणाऱ्या बाबर आझमने (Babar Azam) गेल्या अनेक वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकताच आयसीसीचे पुरस्कार जाहीर केले. पाकिस्तानचा कर्णधार असलेल्या बाबर आझमला 2022 चा वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्काराने (ICC Men's ODI Player of the Year) जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे बाबरचे फॅन्सचा आनंद गगनात मावेना झालाय. एक असा काळ होता. त्यावेळी पाकिस्तान टीमचं (Pakistan) काय होणार? असे प्रश्न विचारले जात होते. मात्र, बाबरने संघात एन्ट्री केली आणि पाकिस्तान संघाला नवसंजिवनी मिळाली. (babar azam crying after father recall struggling old days video viral pakistani captain babar won icc cricketer award sports news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या जबरदस्त कामगिरीने बाबर आझमने जगभरातील क्रिकेट चाहत्यांना वेड लावलं. आज बाबर नव्या उंचीवर असला तरी त्याची क्रिकेटर होण्याचा प्रवास साधा सोप्पा कधीच नव्हता. एक काळ असा होता की बाबरच्या घरात खायला देखील नसायचं. त्याचा किस्सा सांगताना बाबरच्या वडील (Babar Azam Father) भावूक झाल्याचं पहायला मिळालंय. आयसीसीचा अवॉर्ड जाहीर झाल्यानंतर बाबरच्या वडिलांचा एक व्हिडिओ (Babar Azam Father Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.


घरात फक्त एकाच व्यक्तीसाठी जेवण असायचं. मी खाल्लं असतं तर बाबरला उपाशी राहावे लागलं असतं, असं बाबर आझमचे वडील म्हणताना दिसत आहेत. मला 10 वर्षांपासून सूर्यप्रकाशामुळे त्वचेची ऍलर्जी होती. त्यामुळे तो मैदानाच्या आत खेळायचा, मी बाहेर उन्हात बसायचो, असंही ते सांगतात. मला म्हणायचा तुम्ही जेवलात का? मी म्हणायचो हो बेटा मी जेवलोय. आम्ही दोघं एकमेकांशी खोटं बोलायचो, असं त्याचे वडील (Babar Azam Father) म्हणताना दिसत आहेत.


पाहा Video -



दरम्यान, एकदा मला बुट पाहिजे होते, त्यावेळी मला वडिलांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. त्यावेळी मी थोडा निराश झालो अन् तेव्हा मी ठरवलं. जे काही करायचंय ते आपण स्वत:च्या हिंमतीवर करायचं, असं बाबर या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे. त्यावेळी बाबर भावूक झाल्याचं (Babar Azam Crying) देखील पहायला मिळालं. बाबर आझमच्या कठीण काळात त्याच्या वडिलांनी त्याला मोलाची साथ दिली. वेळोवेळी बाबर बोलताना वडिलांचा उल्लेख करताना दिसतो.