Babar Azam Viral Video : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. हा सामना या 26 डिसेंबर रोजी होत असल्याने बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) म्हणून खेळवला जाईल. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 360 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटीमध्ये दोन्ही संघ कशी कामगिरी करणार? यावर सर्वांचं लक्ष असणार आहे. मात्र, दुसऱ्या कसोटीपूर्वी पाकिस्तानच्या खेळाडूंनी सर्वांचं मन जिंकलं आहे. नाताळाच्या दिवशी पाकिस्तानी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंची भट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळचा एक क्यूट व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटवस्तू दिल्या. ऑस्ट्रेलियन कर्णधार सुद्धा पॅट कमिन्स देखील यावेळी उपस्थित होता. ऑस्ट्रेलियन खेळाडू नेटमध्ये सराव करत असताना पाकिस्तानी खेळाडूंनी सर्वांना सरप्राईज दिलं. सराव करत असताना त्याठिकाणी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचं कुटूंब देखील उपस्थित होतं. त्यावेळी उस्मान ख्वाजा आपल्या लाडक्या लेकीसोबत आला होता. बाबर आझमने उस्मानशी चर्चा करत असताना  उस्मान ख्वाजाच्या मुलीने (Usman Khawaja's daughter) बाबरला मिठी मारली. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. 


सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकांनी याला पसंती दिली आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी इनडोअर नेटवर सराव केला. त्याची झलक देखील समोर आली होती. सध्या उस्मान ख्वाजाच्या मुलीच्या व्हिडीओवर अनेकांनी सुंदर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


पाहा Video



दरम्यान, उस्मान ख्वाजा पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीपूर्वी वादात सापडला होता. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत काळ्या हाताची पट्टी घातल्याबद्दल आयसीसीने त्याला फटकारलं होतं. त्याच्या बुटांवर ‘ऑल लाईव्ह्स इक्वल’ आणि ‘फ्रीडम इज अ ह्युमन राइट’ असे लिहिलं होतं. त्यावर आक्षेप घेण्यात आला होता.