Sunil Gavaskar On Pakistan: सध्या सुरू असलेल्या T20 world cup 2022 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये (T20 WC Semi-Final) पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केलं. त्यानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्ताने चाहते 1992-1992 च्या विजयाचा (World Cup 1992) जप करताना दिसत आहे.1992 मध्ये इम्रान खानच्या (Imran Khan) नेतृत्वाखालील पाकिस्तानने वनडे वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला होता. तो वर्ल्ड कप देखील ऑस्ट्रेलियात खेळला गेला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानमध्ये 1992 च्या वर्ल्ड कपचं गुऱ्हाळ गाणं सुरू असतानाच आता भारतात पाकिस्तानवर टोलेबाजी सुरू झाली आहे. भारत वर्ल्ड कप स्पर्धेतून (IND vs ENG) बाहेर पडल्यानं पाकिस्तानी ट्रोलर्सने भारताला निशाण्यावर घेतलं. त्यानंतर भारतीय नेटकऱ्यांनी देखील पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. अशातच आता भारताचे माजी स्टार खेळाडू सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी देखील पाकिस्तानला चिमटे काढले आहेत.


काय म्हणाले सुनिल गावस्कर ?


सुनील गावसकर यांनी 1992 चा वनडे वर्ल्ड कप (World Cup 1992) आणि 2022 च्या T-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2022) तुलनेचा समाचार घेतला. माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी एका कार्यक्रमात म्हटले की, 'त्यांना माहिती आहे, जर पाकिस्तानने हा विश्वचषक जिंकला तर 2048 मध्ये बाबर आझम (Babar Azam) पाकिस्तानचे पंतप्रधान होतील.'


आणखी वाचा - Pakistan PM: नाव शरीफ पण काम बालिश! सेमीफायनलच्या पराभवानंतर भारताला डिवचलं, म्हणाले...


दरम्यान, सुनिल गावस्कर यांचं हे स्टेटमेंट सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Social Media Viral Video) होताना दिसतंय. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर 26 वर्षांनी म्हणजेच 2018 मध्ये इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाले होते. त्यानंतर आता 2048 मध्ये बाबर आझम पंतप्रधान होणार, असं मेजशीर भाकित सुनिल गावस्कर यांनी केलंय.