मुंबई : हैदराबाद आणि कोलकातामध्ये आज फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी सामना रंगणार आहे. आयपीएलच्या 11 व्या सीजनमधील क्वालीफायर-2 सामन्यामध्ये दोन्ही संघ सामना जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे. शुक्रवारी जो संघ सामना जिंकेल तो संघ मुंबईत महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई संघाविरोधात फायनल खेळणार आहे. पण त्याआधी आज कोलकात्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे आयपीएल प्रेमींमध्ये चिंतेचं वातावरण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज कोलकात्यामध्ये पावसाचा अंदाज आहे. पण जर पाऊस झासा तर याचा थेट परिणाम सामन्यावर पाहायला मिळेल. पावसामुळे जर सामना रद्द झाला तर याचा फायदा हैदराबादला होणार आहे. हैदराबाद फायनलमध्ये सरळ प्रवेश करणार आहे. हैदराबाद गुणतालिकेमध्ये सर्वात वरच्या स्थानावर आहे. पण शेवटच्या 4 सामन्यांमध्ये हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला. क्वालीफायर-1 मध्ये हैदराबादला 2 विकेटने पराभवाचा सामना करावा लागला होता.


दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात कोलकाताने मागचे 4 सामने जिंकले आहेत. क्वालीफायर-2 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात 25 रनने कोलकात्याचा विजय झाला होता. दूसरीकडे हैदराबाद देखील यंदाच्या सीजनमध्ये शानदार कामगिरी करतो आहे. चेन्नईच्या विरुद्ध सामन्यात भुवनेश्वर कुमार, सिद्वार्थ कौल आणि राशिद खानने चांगली गोलंदाजी केली. राशिदने चार ओव्हरमध्ये फक्त 11 रन दिले. विलियसमसनने 15 सामन्यांमध्ये आतापर्यंत 685 रन केले आहेत. कार्लोस ब्रॅथवेट देखील फार्ममध्ये आला आहे. मागच्या सामन्यात त्याने चांगली बॅटींग आणि बॉलिंग केली.