सिडनी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंचं निलंबन झालं आहे. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. तर कॅमरून बँक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ही कारवाई केली आहे.


डेव्हिड वॉर्नरची पत्नी रडली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्या प्रकाराला मी जबाबदार असल्याची प्रतिक्रिया डेव्हिड वॉर्नरची पत्नी केंडाईस वॉर्नरनं दिली आहे. माझ्यामुळे डेव्हिडला दक्षिण आफ्रिकेमध्ये टोमणे ऐकावे लागल्याचं केंडाईस म्हणली. हे सांगताना केंडाईसला अश्रू अनावर झाले. सगळी चूक माझीच आहे, असं केंडाईस संडे टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाली.


नेमकं काय झालं दक्षिण आफ्रिकेत


केंडाईस वॉर्नरसोबतच्या संबंधांच्या संदर्भात दक्षिण आफ्रिकेच्या प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये ऑल ब्लॅक रग्बी खेळाडू सोनी बिल विलियम्सचे मुखवटे लावले होते. प्रेक्षक माझ्याकडे बघत होते तसंच इशारेही करत होते. माझ्याकडे बघून हसत होते आणि माझ्यावर गाणीही तयार करण्यात आली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये मी हे सगळं सहन करत होते, असं वक्तव्य केंडाईस वॉर्नरनं केलं आहे. दक्षिण आफ्रिकेत घडत असलेल्या या सगळ्या घटनांमुळे डेव्हिड वॉर्नर अस्वस्थ होता, असा दावा केंडाईस वॉर्नरनं केला आहे. 


पहिल्या टेस्टमध्येही बायकोवरून वाद


पहिल्या टेस्ट मॅचमध्ये वॉर्नर आणि क्विंटन डीकॉकमध्ये जोरदार भांडण झालं. डिकॉकनं पत्नीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप यावेळी डेव्हिड वॉर्नरनं केला होता.


कदाचीत पुन्हा क्रिकेट खेळणार नाही


सिडनीमध्ये डेव्हिड वॉर्नरनं पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये डेव्हिड वॉर्नर रडला. तसंच कदाचीत यापुढे आपण कधीच क्रिकेट खेळू शकणार नाही, अशी शक्यताही त्यानं व्यक्त केली.