लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये सुरुवातीला बसलेल्या दोन धक्क्यांनंतर बांग्लादेशचा डाव सावरला आहे. २३ ओव्हरमध्ये बांग्लादेशचा स्कोअर १२३/२ एवढा झाला आहे. तमीम इक्बाल नाबाद ५० रन्सवर तर मुशफिकर रहीम ३० रन्सवर खेळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडला 8 गडी राखून हरवले होते. पण पावसामुळे दुसरा उपांत्य सामना रद्द झाला तर टीम इंडिया फायनलमध्ये प्रवेश करेल.


भारतीय संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, युवराज सिंह, महेंद्र सिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, आर.अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा


बांग्लादेश संघ : तमीम इकबाल, सौम्य सरकार, शब्बीर रहमान, मुशफिखुर रहमान, शाकिब अल हसन, महमुदुल्ला, मोसडेक हुसैन, मुर्तजा, रुबैल हुसैन, तस्कीन अहमद, रहमान