मुंबई : लाईव्ह मॅचमध्ये अंपायरला मैदाना सोडून जाण्याची वेळ आली. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला मैदान सोडावं लागलं. ही घटना बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका सुरू असलेल्या सामन्यात घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका पहिला कसोटी सामना खेळवला जात होता. चटगाव इथे सुरू असलेल्या सामन्यातील चौथ्या दिवशी अंपायरची प्रकृती अचानक बिघडली. 


LIVE मॅचमध्ये बिघडली अंपायरची तब्येत
मैदानात अंपायरची तब्येत बिघडल्याने त्याला मॅच सोडून जावं लागलं. अंपायर रिचर्ड केटलब्रॉ यांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यामुळे मॅचमधून बाहेर पडावं लागलं. भयंकर उष्णता असल्याने त्यांना त्रास झाल्याची माहिती मिळाली. 


रिचर्ड मैदानातून बाहेर गेल्यानंतर टीव्ही अंपायर विल्सन यांना अंपायर म्हणून पुढचा खेळ पाहावा लागला. उन्हापासून वाचण्यासाठी मैदानात खेळाडूंनी छत्र्या मागवल्या होत्या. याशिवाय ड्रिंग्सची विशेष सोय करण्यात आली. सोशल मीडियावर या घटनेची खूप चर्चा होत आहे.