मुंबई : आयपीएलनंतर टीम इंडिया लगेच इंग्लंड दौऱ्यावर गेली. तिथे 3 टी 20 आणि वन डे सामन्यांची सीरिज सुरू आहे. आता ही सीरिज संपताच ऑगस्टमध्ये टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर 3 वन डे सामने खेळवण्यात येणार आहे. 6 वर्षांनंतर टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही सीरिज दोन्ही टीमसाठी महत्त्वाची आहे. कारण या सीरिजमध्ये मिळणारे पॉईंट्स हे वन डे वर्ल्ड कपच्या दृष्टीनं महत्त्वाचे असणार आहेत. 2023 मध्ये वन डे वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी ही सीरिज जिंकणं दोन्ही टीमसाठी गरजेचं आहे. त्यामुळे चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. 


क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार 18, 20 आणि 22 ऑगस्ट रोजी वन डे मॅच होणार आहे. झिम्बाव्बेची कामगिरी आतापर्यंत फार काही चांगली राहिली नाही. टीम इंडिया आता इंग्लंड विरुद्ध 3 वन डे सामने खेळणार आहे. त्यानंतर वेस्टइंडिज दौऱ्यावर आहे. हा दौरा संपल्यानंतर झिम्बाव्वे दौऱ्यावर जायचं आहे. 


टीम इंडियाचे खेळाडू झिम्बाब्वेला 15 ऑगस्टपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हा सामना हरारे इथे होऊ शकतो. एवढंच नाही तर टीम इंडियाचे खेळाडू या दौऱ्यासाठी खूप खूश असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. 


टीम इंडियाने 2016 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे दौरा केला होता. तेव्हा 3 वन डे आणि 3 टी 20 सामने खेळवण्यात आले होते. यावेळी टी 20 सीरिज खेळवण्यात येणार नाही. टी 20 एशिया कपमुळे स्थगित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.