मुंबई :  भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड अर्थातच बीसीसीआयची (BCCI) आज (18 ऑक्टोबर 2022) मुंबईमध्ये वार्षिक बैठक झाली आहे. या बैठकीदरम्यान बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा पदभार माजी कर्णधार सौरभ गांगूली ऐवजी 1983 वर्ल्ड कप विजेता टीमचे सदस्य रोजर बिन्नी (Roger Benny) यांनी स्विकारली आहे. रोजर बिन्नी यांच्या सोबतच इतर सदस्यांसाठी देखील आज निवडणूकीची औपचाकरिकता झाली, याचं कारण म्हणजे या सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. एजीएममध्ये आयसीसी चेअरमन पदासंबंधी देखील चर्चा झाली आहे.



आयसीसी चेअरमन पदासाठी होणार निवडणूक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसी चेअरनमन पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर आहे. येत्या 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान मेलबार्गमध्ये आयसीसी बोर्डची बैठक होणार आहे.


सौरभ गांगुलीच काय होणार?


भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) बीसीसीआयतून (BCCI) होणाऱ्या निरोपामुळे खुप चर्चेत राहीला. आयसीसीच्या टॉप पोस्टसाठी सौरभ गांगुलीच्या नावाची चर्चा होणार की नाही याकडे सर्वाचं लक्ष आहे. त्यासोबतच, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या नावाची देखील चर्चा सुरु आहे.


आयपीएल ऑक्शनसंबंधी होणार मोठी घोषणा?


बीसीसीआयच्या ए़जीएमनंतर अरुण धुमाळ (Arun Dhumal) हे नवीन आयपीएल व्यवस्थापन परिषदेची बैठकीची अध्यक्षतेपदी विराजमान होतील. या बैठकीमध्ये आगामी आयपीएलच्या ऑक्शनसंबंधीच्या तारखेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे आणि त्यातबरोबर, महिला आयपीएल संबंधी देखील चर्चा होणार आहे. त्यासोबतच, भारतात पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी टॅक्समध्ये सुट देण्याबद्दलची चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने आयसीसीला भारतात होणाऱ्या सामन्यांसाठी टॅक्समध्ये सुट नाही दिली तर बीसीसीआयला 955 कोटी रुपयांच नुकसान होऊ शकतं.