India squad for South Africa tour : आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ निवडण्यासाठी पुरुष निवड समितीची गुरुवारी नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून बीसीसीआयने  (BCCI) काही प्रश्नांवर स्पष्ट संकेत दिले आहेत. आगामी दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या केएल राहुल (KL Rahul) टीम इंडियाचा कॅप्टन असणार आहे. तर टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) खांद्यावर संघाची जबाबदारी असेल. त्याचबरोबर रोहित शर्मा (Rohit Sharma) टेस्ट क्रिकेटचं आव्हान पार पाडणार आहे.


कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ: 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा (C), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (WK), केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद. शमी*, जसप्रीत बुमराह (VC), प्रसिद्ध कृष्णा.


टी-20 सामन्यांसाठी भारताचा संघ: 


यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (C), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (WK), जितेश शर्मा (WK), रवींद्र जडेजा (VC), वॉशिंग्टन सुंदर , रवी बिश्नोई, कुलदीप यादव,अर्शदीप सिंग, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.


वनडेसाठी भारताचा संघ:


ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (C), संजू सॅमसन (WK), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.


रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दौऱ्यातील व्हाईट-बॉल क्रिकेटमधून विश्रांती घेण्याची विनंती बोर्डाकडे केली होती. तर मोहम्मद शमीवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू असून तो खेळणार की नाही? हे फिटनेसवर अवलंबून आहे.


टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T-20 सामना 10 डिसेंबरला डर्बनमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा टी-20 सामना 12 डिसेंबरला खेळवला जाईल. तिसरा T- 20 14 डिसेंबरला होणार आहे. 17 डिसेंबरपासून वनडे मालिका सुरू होणार आहे. हा सामना जोहान्सबर्ग येथे होणार आहे. यानंतर दुसरा सामना 19 डिसेंबरला तर तिसरा सामना 21 डिसेंबरला होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरपासून तर दुसरा सामना 3 जानेवारीपासून होणार आहे. आगामी तीन टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियासाठी ही सिरीज महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे आता टीम इंडियासाठी हा दौरा लिटमस टेस्ट असणार आहे.


मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचं राहणार


 दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) आणि सपोर्ट स्टाफ यांच्या करारात वाढ केल्याची  घोषणा केली. बीसीसीआयने द्रविडशी चर्चा केली आणि एकमताने कार्यकाळ पुढे नेण्यास सहमती दर्शविली. या कराराचा नेमका कालावधी किती हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता आगामी काळात राहुल द्रविड यांच्याकडेच संघाला शिस्त लावण्याची जबाबदारी असणार आहे.


पाहा वेळापत्रक


१० डिसेंबर २०२३: पहिला टी -२० सामना, डर्बन


१२ डिसेंबर २०२३: दुसरा टी -२० सामना, ग्केबेरहा


१४ डिसेंबर २०२३ : तिसरा टी -२० सामना, जोहान्सबर्ग


१७ डिसेंबर २०२३: पहिला वनडे सामना, जोहान्सबर्ग


१९ डिसेंबर २०२३ : दुसरा वनडे सामना, ग्केबेरहा


२१ डिसेंबर २०२३: तिसरा वनडे सामना, पार्ल


२६ ते ३० डिसेंबर, २०२३: पहिला कसोटी सामना, सेंच्युरियन


३ जानेवारी ते ७ जानेवारी, २०२४: दुसरा कसोटी सामना, केपटाऊन