मुंबई : वेस्टइंडिज क्रिकेट टीम लवकरच भारत दौऱ्यावर ( west indies tour of india 2022) येणार आहे. या दौऱ्यात  विंडिज टीम इंडियाविरुद्ध वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी बीसीसीआयने 18 सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला आहे. कर्णधार रोहित शर्माचं (Rohit Sharma) संघात दुखापतीनंतर पुनरागमन झालं आहे. (bcci announced team india 18 member squad for upcoming odi and t 20 series against west indies)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि आवेश खान


टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर, आवेश खान आणि हर्षल पटेल. 


विडिंज विरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेचं वेळापत्रक 


पहिली वनडे - 6 फेब्रुवारी 
दुसरी वनडे - 9 फेब्रुवारी
तिसरी वनडे -12 फेब्रुवारी


वरील तिन्ही सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत.  


पहिली टी 20 - 15 फेब्रुवारी 
दुसरी टी 20 - 18 फेब्रुवारी
तिसरी टी 20 - 21 फेब्रुवारी 


टी 20 मालिकेतील तिन्ही सामने कोलकातातील इडन गार्डनमध्ये पार पडतील.