India Squad for Ireland Series : आयर्लंड विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, पंतनंतर `या` खेळाडूकडे कॅप्टन्सी
टीम इंडिया आयर्लंड (India vs Ireland t20i Series) विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे.
मुंबई : टीम इंडिया आयर्लंड (India vs Ireland t20i Series) विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या टी 20 मालिकेसाठी बीसीसीआय (bcci) टीम इंडियाची घोषणा केली आहे. या मालिकेत टीम इंडियाला आणखी एक नवा कर्णधार मिळाला आहे. (bcci announced team india squad against ireland t20i series hardik pandya give captaincy suryakumar yadav and sanju samson comback)
तसेच भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि संजू सॅमसनची (Sanju Samson) टीममध्ये एन्ट्री झाली आहे. तर श्रेयस अय्यरला वगळण्यात आलंय.
आयर्लंड विरुद्धच्या सीरीजसाठी टीम इंडिया
हार्दिक पंड्या (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.