BCCI कडून आगामी वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा; `या` खेळाडूकडे दिलं कर्णधारपद
भारतीय क्रिकेट बोर्डाकडून (Board of Control for Cricket in India) आज म्हणजेच 5 डिसेंबर रोजी आगामी वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 16 सदस्यांचा समावेश आहे.
ICC Under 19 Women’s World Cup : भारतीय क्रिकेट बोर्डाकडून (Board of Control for Cricket in India) आज म्हणजेच 5 डिसेंबर रोजी आगामी U19 टी-20 वर्ल्डकपसाठी (India U19 Women’s team for SA T20s) टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 16 सदस्यांचा समावेश आहे. महिला U19 टी-20 वर्ल्डकप आता जवळ आल्यामुळे महिलांच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये टीम इंडियाच्या कर्णधारपदी युवा खेळाडूची नियुक्ती करण्यात आली आहे. टीम इंडियाची ओपनर (Team India Opener) शेफाली वर्मा (Shafali Verma) हिच्याकडे टीम इंडियाचं नेतृत्व सोपवण्यात आली आहे.
14 जानेवारीपासून सुरु होणार U19 वर्ल्डकप
अखिल भारतीय महिला निवड समितीने दक्षिण आफ्रिका U19 सिरीज आणि त्यानंतर ICC U19 महिला वर्ल्डकपसाठी भारतीय U19 महिला टीमची (Team India) निवड करण्यात आली आहे. ICC U19 महिला T20 वर्ल्डकपच्या पहिल्या भागात 16 टीम्सचा समावेश असणार आहे.
याचा पहिला सामना 14 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. तर अंतिम सामना 29 जानेवारी रोजी खेळवला जाईल. या स्पर्धेत टीम्सना 2 ग्रुप्समध्ये वर्गीकरण करण्यात आलं आहे. प्रत्येक गटातील टॉप तीन टीम्स सुपर सिक्स फेरीत प्रवेश करतील. या ठिकाणी टीम्सना सहा जणांच्या दोन गटात ठेवलं जाईल.
प्रत्येक गटातील टॉपच्या दोन टीम्स उपांत्य फेरीत जातील. 27 जानेवारी रोजी पॉचेफस्ट्रूममध्ये जेबी मार्क्स ओव्हल या ठिकाणी खेळला जाईल. तर याच ग्राऊंडवर 29 जानेवारीला अंतिम सामना रंगणर आहे.
दक्षिण आफ्रिका सिरीज आणि वर्ल्डकपसाठी टीम इंडिया
SA T20s साठी भारताची U19 Team India
शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सहरावत (उपकर्णधार), ऋचा घोष (WK), जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, हर्षिता बसु (WK), सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्शवी चोपडा, तीता साधु, फलक नाज, शबनम एमडी, शिखा, नजला सीएमसी, यशश्री
ICC अंडर 19 महिला वर्ल्डकपसाठी Team India
शैफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सहरावत (उपकर्णधार), ऋचा घोष (WK), जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, हर्षिता बसु (WK), सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्शवी चोपडा, तीता साधु, फलक नाज, शबनम एमडी
स्टँडबाय खेळाडू : शिखा, नजला सीएमसी, यशश्री