IND vs SA : दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर
दक्षिण आफ्रिका टीम जून महिन्यात भारत (South Africa tour India 2022) दौऱ्यावर येणार आहे.
मुंबई : दक्षिण आफ्रिका टीम जून महिन्यात भारत (South Africa tour India 2022) दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात आफ्रिका टीम इंडिया (Team India) विरुद्ध 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या आगामी टी 20 मालिकेसाठी बीसीसीआयने (Bcci) सामन्यांचे वेळापत्रक आणि ठिकाण जाहीर केले आहेत. बीसीसीआयने ट्विट करत माहिती दिली आहे. (bcci announced venue and timetable upcoming india vs south africa t 20i series)
या टी 20 सीरिजला 9 जूनपासून सुरुवात होणार आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2022) दृष्टीने टीम इंडियासाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे.
टी 20 मालिकेचं वेळापत्रक
मॅच तारीख ठिकाण
पहिला सामना 9 जून दिल्ली
दुसरा सामना 12 जून कटक
तिसरी मॅच 14 जून वायझॅग
चौथा सामना 17 जून राजकोट
पाचवी मॅच 19 जून बंगळुरु
दरम्यान बीसीसीआयने या टी 20 सीरिजसाठी टीमची घोषणा अजून केलेली नाही.