मुंबई : BCCI Pay Equity Policy क्रिकेट वर्तुळातून सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (jay shah) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनंतर टीम इंडियाच्या (Team India) महिला खेळाडूंना  मोठा दिलासा मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या टीम इंडियाच्या (Team India)  महिला खेळाडूंना (team india Women) आता पुरुषांप्रमाणेच (team india men) मॅचचं मानधन मिळणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह (jay shah) यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे.  जय शाह यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे. 


 'म्हारी छोरियां छोरों से कम हैं के', महिला क्रिकेटर्सनी पुरूष संघाच्या रेकॉर्डशी साधली बरोबरी


टीम इंडियाच्या (Team India) महिला खेळाडूंना आता पुरुषांप्रमाणेच मॅचचं मानधन मिळणार आहे. स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीनं उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. आता महिलांच्या क्रिकेट टीमलाही टेस्ट मॅचसाठी 15 लाख, वन डेसाठी 6 लाख मानधन मिळणार आहे. 



तसेच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक सामना खेळण्यासाठी पुरुषांना 3 लाख रुपये मिळतात. आता हीच फी महिला क्रिकेटपटूंनाही दिली जाणार आहे. या निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल जय शहा (jay shah) यांनी सर्वोच्च परिषदेचेही आभार मानले आहेत.बीसीसीआयच्या (BCCI) या निर्णय़ाने महिला खेळाडूंना देखील दिलासा मिळाला आहे. 


दरम्यान यंदाच्या वुमेन्स आशिया कपवर (Women's Asia Cup) टीम इंडियाच्या (Team India) महिला संघाने नाव कोरले आहे. या विजयासह टीम इंडियाच्या महिला संघाने हा विजय मिळवून सातव्यांदा आशिया कपवर नाव कोरले आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) तिसऱ्यांदा हा आशिया कप उंचावला आहे. या आशिया कपच्या (Women's Asia Cup) विजयानंतर महिला संघाचे सर्वत्र कौतूक होत आहे.