BCCI Awards 2024 : शुभमन गिल ठरला सर्वोत्तम क्रिकेटर पुरस्काराचा मानकरी, रवी शास्त्री यांना जीवनगौरव पुरस्कार!
Polly umrigar award 2023 : मागील वर्षीचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटरचा पुरस्कार शुभमन गिल (Shubhman gill) याला मिळाला आहे.
BCCI Annual Award : गेल्या 4 वर्षापासून रखडलेला बीसीसीआयचा पुरस्कार सोहळा आज पार पडला. अशातच आता यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गज खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. यावेळी भारतीय संघाव्यतिरिक्त इंग्लंडच्या पुरुष क्रिकेट संघाचे सदस्यही उपस्थित होते. मागील वर्षीचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटरचा पुरस्कार शुभमन गिल (Shubhman gill) याला मिळाला आहे. तर रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि फाहरूख इंजिनियर (Farokh Engineer) यांना सीके नायडू जीवनगौरव पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
श्रेयस अय्यरला 2021-22 चा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरस्कार मिळाला. तर स्मृती मानधना हिला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला. तर मोहम्मद शमीला पॉली उम्रीगर अवॉर्ड (Polly umrigar award) बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटरचा पुरस्कार (2019-20) मिळाला आहे. तर रविचंद्रन आश्विनला 2020-21 चा पॉली उम्रीगर अवॉर्ड मिळाला आहे. तर जसप्रीत बुमराहला 2021-22 चा पॉली उम्रीगर अवॉर्ड देण्यात आला. तर शुभमन गिलला 2022-23 चा पॉली उम्रीगर अवॉर्ड मिळाला.
टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना बीसीसीआयचा जीवनगौरव पुरस्कार (lifetime achievement award) मिळाला आहे. तर फाहरूख इंजिनियर (Farokh Engineer) यांना देखील सीके नायडू जीवनगौरव पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
दरम्यान, सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू पुरस्कार दीप्ती शर्मा आणि स्मृती मानधना यांना देण्यात आलाय. दीप्ती शर्माला २०१९-२० आणि २०२२-२३ साठी तर, स्मृती मानधनाला २०२०-२१ आणि २०२१-२२ साठी पुरस्कार देण्यात आलाय.