मुंबई : क्रिकेटमध्ये नवे बदल आणणाऱ्या लोढा समितीच्या शिफारसींमूळे अनेक बदल घडत आहेत. अजून पूर्णपणे या शिफारसी लागू झाल्या नसल्या तरी एवढ्यापासूनच काही माजी खेळाडूंच्या अडचणी वाढल्या आहे.


यांच्या अडचणीत वाढ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये सुनील गावस्कर आणि संजय मांजरेकर अशा दिग्गजांची नावे आहेत. क्रिकेटर मुरली कार्तिक आणि कॉमेंटेटर हर्षा भोगले या अडचणींचा सामना करताना दिसत आहेत.


गावस्करांची अशी झाली गोची


 बीसीसीआयशी संबंधित असलेले लोक एकच काम करु शकतात असे त्यावेळी सांगितले जात होते.त्यानंतर बोर्डच्या आदेशानुसार, सुनील गावस्करने स्वत:ची प्लेअर मॅनेजमेंट कंपनी बंद केली होती. एवढ्यातच गावस्कर यांच्या अडचणी संपल्या नाहीत. 


हा आहे नवा नियम


आता लोढा समितीच्या शिफारसीनुसार बीसीसीआयमध्ये एक नवा नियम येणार आहे. यानुसार जे माजी क्रिकेटर बीसीसीआयशी जोडले गेले आहेत ते कोणते वेगळे काम करु शकत नाहीत. जर बीसीसीआयने या शिफारसी लागू केल्या तर गावस्कर यांच्यासहित अनेक माजी खेळाडूंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


दोनपैकी एक निवडा


 गावस्कर यांच्यासहित संजय मांजरेकर, मुरली कार्तिक, हर्षा भोगले ही मंडळी कॉमेंटेटेर म्हणून तसेच एक्सपर्ट कॉलम लिहिण्याचे काम करतात. पण नव्या नियमानुसार या दोघांमधील एकच काम त्यांना निवडावे लागणार आहे. 


काहींनाच सूट


मीडिया वृत्तानुसार २४ नोव्हेंबरला अॅडमिनिस्ट्रेटर ऑफ कमिटीटी मिटींग झाली होती. बीसीसीआयचा त्यांच्या कॉमेंटेटरसोबत झालेल्या करारावर यावेळी चर्चा झाली. यामध्ये काही कॉमेंटेटर्सनाच स्पॉन्सर्ड कॉलम लिहिण्याची सूट देण्यात आली आहे. 


निर्णय घेणार


अशा परिस्थितीत, बीसीसीआय आता माजी खेळाडू कॉमेंटेटर्स हे एक्सपर्ट कॉलम लिहू शकतात का यावर विचार करू शकते. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या ओम्बुड्समॅन याचा निर्णय घेण्यात येणार आहे.


सध्या गावसकर हे कॉमेंट्री करण्यासोबत क्रिकेट अॅवॉर्ड आणि रेटिंग देणाऱ्या संस्थेशी जोडले आहेत. 


लक्ष्मण आणि सेहवाग यांना सूट 


हा नियम हिंदी कॉमेंटेटर्सससाठी लागू नसणार आहे. त्यामूळे स्टार स्पोर्ट्ससाठी कॉमेंट्री करणाऱ्या लक्ष्मण आणि सेहवाग यांच्यावर या नियमांचा काही परिणाम होणार नाही. कारण या दोघांचा करार बीसीसीआय सोबत नसून स्टार स्पोर्ट्ससोबत आहे.  त्यामूळे हे दोन्ही माजी क्रिकेटपटू त्यांचे कॉलम यापूढेही लिहित राहू शकतील.