मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) नवा अध्यक्ष मिळणार आहे. मंडळाच्या विविध पदांसाठी निवडणूक होणार असून, त्यासाठी मंगळवारी अर्ज भरले जातायत. मात्र निकाल बिनविरोध येईल, असा विश्वास व्यक्त केला जातो. 1983 च्या वर्ल्डकप विजेत्या टीमचे सदस्य असलेले रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होऊ शकतात. म्हणजेच सौरव गांगुलीचा बोर्ड अध्यक्षपदाचा प्रवास आता संपणार आहे. गांगुली यांनी 2019 मध्ये हे पद स्वीकारलं होतं.


सर्व सदस्यांची बिनविरोध निवड होणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयच्या एका माजी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे बॉस असणार आहेत आणि ते सौरव गांगुलीची जागा घेतील. त्यांच्याशिवाय जय शहा सचिवपदी, तर आशिष शेलार खजिनदारपदी कार्यरत राहणार आहेत. 
निरंजन शहा म्हणतात की, ते सर्व बिनविरोध निवडून येतील अशी अपेक्षा आहे. आशिष शेलार खजिनदार झाले तर ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर होतील.


कोणाकडे येणार कोणती जबाबदारी?


  • रॉजर बिन्नी - अध्यक्ष

  • जय शहा - सचिव

  • राजीव शुक्ला - उपाध्यक्ष

  • आशिष शेलार - खजिनदार

  • देवजित सैकिया - सहसचिव

  • अरुण धुमाळ - आयपीएल चेअरमन


बीसीसीआयच्या निवडणुकीतही काही धक्कादायक नावं समोर येण्याची शक्यता आहे. मात्र, अरुण सिंग धुमाळ आता आयपीएलचे नवे अध्यक्ष होऊ शकतात. तर राजीव शुक्ला उपाध्यक्षपदावर कायम राहू शकतात. सध्या बीसीसीआयची कमान माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या हातात आहे, तर जय शाह सचिवपदावर आहेत. 


सुप्रीम कोर्टात नुकतंच बीसीसीआयशी संबंधित एका खटल्याची सुनावणी झाली होती, त्यानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता.


गांगुली-जय शहा यांचा कार्यकाळ येणार संपुष्टात


सौरव गांगुली आणि जय शाह यांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार आहे, दोघांनी 2019 मध्ये पदभार स्वीकारला. बीसीसीआयची गणना जगातील सर्वात मजबूत आणि श्रीमंत क्रिकेट बोर्डांमध्ये केली जाते. सौरव गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मुदतवाढ मिळू शकते किंवा आयसीसी अध्यक्षपदासाठी नामांकन मिळू शकतं, असं यापूर्वी मानलं जात होतं. मात्र, त्यावर अजूनही कोणतंही नवीन अपडेट आलेलं नाही.