भारतीय संघ मागील टी-20 वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता. यानंतर आता बीसीसीआयने टी-20 संघात फक्त तरुण खेळाडूंनाच संधी देण्याचा विचार केला आहे. टी-20 वर्ल्डकप आता काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. यादरम्यान काही रिपोर्ट्सनुसार, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली आता टी-20 क्रिकेट खेळताना दिसणार नाहीत. पण हे रिपोर्ट फेटाळले जात आहेत. कारण मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना त्यांच्या टी-20 मधील भवितव्याचा निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे ते दोघं जो काही निर्णय घेतली तो बीसीसीआयला मान्य असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार, बोर्ड या दोन्ही खेळाडूंवर कोणताही दबाव टाकणार नसून त्यांना त्यांच्या भवितव्याचा निर्णय घेण्याची सूट देणार आहे. जर रोहित शर्मा, विराट कोहली फिट असतील आणि त्यांची टी-20 वर्ल्डकप खेळण्याची इच्छा असेल तर दोघंही संघाचा भाग असतील आणि बीसीसीआय त्यांच्या पाठीशी उभी राहील. 


पण रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. वर्ल्डकपमधील पराभवानंतर दोन्ही खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरोधातील 5 सामन्यांच्या मालिकेतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेत दोघेही खेळण्याची शक्यता आहे. याशिवाय राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपत असून, तो वाढवण्याची त्याची इच्छा नाही. यामुळे बीसीसीआय लवकरच नव्या प्रशिक्षकाची घोषणा करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी खेळाडू आणि द्रविडचा एकेकाळचा सहकारी व्हीव्हीएस लक्ष्मणच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली जाऊ शकते. यामुळे टी 20 वर्ल्डकपआधी भारतीय संघाला सूर गवसेल अशी आशा आहे. 


भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकला  होता तेव्हा रोहित शर्मा त्या संघाचा भाग होता. दरम्यान 2024 चा वर्ल्डकप त्याची ही स्पर्धा जिंकण्याची शेवटची संधी असू शकते. त्यामुळे तो संघात पुनरागन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


दुसरीकडे रोहित शर्माला त्याच्या टी-20 संबंधी निर्णय घ्यायचा आहे. बीसीसीआयने त्याला वेळ दिला असून, दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेआधी निर्णयाची घोषणा होऊ शकते. जर रोहित शर्माने टी-20 पासून लांब राहण्याचा निर्णय घेतला तर हार्दिक पांड्याची कर्णधारपदी नियुक्ती केली जाऊ शकते.