मुंबई : टीम इंडीयाला T20 वर्ल्डकप आपल्या घरच्या मैदानावरती खेळायचे आहे. त्यामुळे T20ची तयारी अगदी जोरदार सुरु आहे आणि BCCI ही अगदी लक्ष ठेऊन काम करत आहेत. त्यामुळेच भारतीय क्रिकेट बोर्डने, टीम इंडियाच्या सरावासाठी T20 वर्ल्डकपच्या आधी T20 सीरीज घेण्याचे ठरवत आहेत. जेणे करुन भारतीय टीमची Practice या मार्फत होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत ऑक्टोंबरमध्ये दक्षिण आफ्रीका आणि न्यूझीलंडबरोबर T20 सीरीज खेळू शकतो. टी -२० वर्ल्डकपच्या तयारी विषयी विचार करुन भारतीय बोर्ड या संदर्भात, दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाशी संवाद साधत आहेत.


बीसीसीचा प्लॅन काय?


बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "टी -20 वर्ल्डकप होण्यापूर्वी दक्षिण आफ्रीका आणि न्यूझीलंड हे टी -20 मालिका खेळण्यासाठी भारतात येऊ शकतात. त्याबद्दलचा संवाद अंतिम टप्यात आहे. वर्ल्डकप होण्यापूर्वी बोर्डाने संघासाठी ही मॅच आवश्यक मानली आहे, म्हणूनच त्यांनी हे पाऊल उचलले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात गेल्या वर्षी मार्चमध्ये होणाऱ्या टी -20 सीरीजला कोरोनामुळे स्थगिती दिली होती. त्यामुळे यावर्षी दोन्ही देश टी-20 खेळू शकतात.


इंग्लंडनंतर वर्ल्डकपपर्यंत कोणतीही टी -20 सीरीज नाही


सध्या तरी इंग्लंडविरुद्ध टी -20 मालिकेनंतर भारतीय संघाकडे वर्ल्डकप होण्यापूर्वी, कोणत्याही टी -20 मालिकेचे शेड्यूल नाही. आयपीएल 2021 नंतर भारत इंग्लंडला जाईल, तेथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि 5 टेस्ट सामन्यांची सीरीज खेळणार आहे. 


सप्टेंबरच्या मध्यावर टीम इंडिया इंग्लंडहून परत येईल. टी -20 वर्ल्डकपनंतर न्यूझीलंड भारतात एक कसोटी मालिका खेळेल. त्यानंतर डिसेंबर-जानेवारीत भारतीय टीम दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यावर असेल.


याचा अर्थ असा की, याक्षणी तरी कोणतीही टी 20 सीरीज होणार नाही. आता जर भारत एक-दोन टी -२० सीरीज खेळला तर, टी -20 वर्ल्डकपच्या तयारीला निश्चितचं बळं मिळेल.