कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सौरव गांगुलीला कोलकाताच्या वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



माजी भारतीय कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला शुक्रवारी 1 जानेवारी रोजी छातीत दुखत असल्याच्या कारणाने रुग्णालयात दाखल केलं गेलं. सध्या गांगुलीची प्रकृती सुधारत आहे आणि डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.