मुंबई : बीसीसीआयच्या सचिवांनी किंवा कोणत्याही अधिकाऱ्याने निवड समितीच्या बैठकांमध्ये भाग घेऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बीसीसीआयचे सचिव निवड समितीच्या बैठकांमध्ये नवीन संविधान लागू झाल्यानंतरही भाग घेत आहेत, असं प्रशासकीय समितीच्या लक्षात आलं आहे. एवढच नाही तर निवड समिती सचिवांना इमेल करुन माहिती द्यायची. ज्यामुळे मॅच बघण्याची प्रवासाची व्यवस्था करायला सांगितलं जायचं. पण आता निवड समितीला टीममध्ये करण्यात आलेल्या कोणत्याही बदलासाठी सचिव किंवा सीईओ यांची परवानगी घ्यायची गरज नाही,' असं प्रशासकीय समितीने सांगितलं आहे.


'परदेश दौरे सोडून संबंधित निवड समितीचे अध्यक्ष समितीची बैठक, पुरुष टीमची निवड, ज्युनियर टीमची निवड आणि महिला टीमच्या निवड यांच्या बैठकांचं आयोजन करू शकतात. तर परदेश दौऱ्यासाठी प्रशासनिक प्रबंधक बैठकांचे प्रभारी असतील,' असं प्रशासकीय समितीने स्पष्ट केलं आहे.


'परदेश दौऱ्यांमध्ये प्रशासनिक प्रबंधक बीसीसीआयच्या संविधानानुसार बैठकीचं आयोजन करेल. पण कोणताही अधिकारी किंवा सीईओ क्रिकेट समितीच्या बैठकीत शामिल होऊ शकणार नाही,' असं क्रिकेट संचालन समितीने सांगितलं.