Impact Player Rule: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच BCCI सध्या क्रिकेटमधील (Cricket) एक नियम बदलण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमामुळे क्रिकेटला एक वेगळं वळण दाट लागण्याची शक्यता वर्तवली जातेय. या नियमानुसार, सामन्यादरम्यान प्लेइंग XI मध्ये 11 ऐवजी 15 खेळाडू पात्र असतील. दोन्ही टीमच्या कर्णधारांना चार अतिरिक्त खेळाडू वापरता देखील येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

BCCI या नियमांचा वापर देशांतर्गत क्रिकेट स्पर्धत आणि IPLमध्ये करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे येत्या सिजनमध्ये आयपीएलची रंगत आणखी वाढणार आहे. कोणत्याही सामन्यात 11 ऐवजी 15 खेळाडू मैदानात उतरून सामना खेळण्यासाठी पात्र असणार आहे. 'इम्पॅक्ट प्लेयर' या नावाचा हा नियम असेल. बीसीसीआय 11 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत 'इम्पॅक्ट प्लेयर' नियम  (Impact Player Rule) लागू केला जाऊ शकतो.


Impact Player Rule कसा असले?


इम्पॅक्ट प्लेयर नियमानुसार, सामन्यादरम्यान प्लेइंग XI मधील कोणताही एक खेळाडू बदलता येऊ शकतो. कर्णधाराला टॉसच्या वेळी 4 अतिरिक्त खेळाडूची नावे द्यावी लागतील.  या चार खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूला सामना खेळता येऊ शकतो. BCCI ने सर्व राज्यातील क्रिकेट टीमना नोटीस पाठवण्यात आली आहे.


नियमानुसार, इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा उपयोग दोन्ही टीमना फक्त एकदाच करता येणार आहे. टीमचा कर्णधार, टीमचे प्रशिक्षक किंवा टीम मॅनेजर यांना मैदानी किंवा फोर्थ अंपायरकडे इम्पॅक्ट प्लेयरची नावं सोपवावी लागतील. जो खेळाडू बाहेर होईल, त्याला उर्वरित चालू सामन्यात संधी दिली जाणार नाही. बीसीसीआय या नियमाबाबतील अधिकची घोषणा येत्या काही दिवसात करण्याची शक्यता आहे.


आशिया कप जिंकला आता T20 World Cup वर नजर...श्रीलंकेचा संघ जाहीर!


बिग बॅशमध्ये देखील असाच नियम-


ऑस्ट्रेलियामधील प्रसिद्ध बीग बॅश (BBL) स्पर्धेत देखील असा नियम लागू आहे. दोन्ही टीमला पहिल्या डावाच्या 10 व्या ओव्हरआधी 12 वा किंवा 13 वा खेळाडू वापरण्याची संधी असते. मात्र, बीसीसीआयच्या नियमानुसार 14 व्या ओव्हरआधी Impact Player सामन्यामध्ये वापरता येणार आहे.