नवी दिल्ली : भारताची कर्णधार मिताली राजच्या वुमेन इन ब्लू टीमसाठी बीसीसीआय खास सन्मान सोहळ्याचं आयोजन करणार असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाची तारीख आणि ठिकाण अजून ठरलेलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, बीसीसीआयनं भारतीय महिला टीममधील प्रत्येक क्रिकेटपटूला 50 लाख तर सपोर्टला 25 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय. या सोहळ्यातच या टीमला ही बक्षीसाची रक्कम देण्यात येणार आहे. 


तसंच या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही बोलवणार असल्याचा विचार बीसीसीआयचा आहे. दरम्यान, फायनलमध्ये भारतीय टीमला रोमहर्षक लढतीत यजमान इंग्लंडकडून 9 रन्सनं पराभव स्वीकारावा लागला होता.