मुंबई टीमच्या खेळाडूंवर मधमाशांच्या हल्ला, पाहा व्हिडीओ
ट्रेनिंग करावं की नाही हाच मोठा प्रश्न! मुंबई टीमच्या खेळाडूंवर मधमाशांचा हल्ला, पाहा व्हिडीओ
मुंबई : मुंबई विरुद्ध चेन्नई आज सामना होत आहे. मुंबई टीम सर्वात वाईट फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत झालेल्या 6 पैकी एकाही सामन्यात जिंकण्यात यश आलं नाही. आज आयपीएलमध्ये पहिल्यांदा चेन्नई विरुद्ध मुंबई सामना होणार आहे. या सामन्याआधी मुंबई टीममधून मोठी बातमी येत आहे.
मुंबई टीमच्या खेळाडूंवर हल्ला झाला आहे. सरावादरम्यान मुंबईच्या खेळाडूंवर मधमाशांनी हल्ला केला. याची माहिती मुंबईने स्वत: ट्वीट करून दिली. सराव करावा की नाही असा प्रश्न आहे असं कॅप्शन यामध्ये दिलं आहे.
मुंबईचे खेळाडू या हल्ल्यापासून वाचण्यासाठी सराव सोडून मैदानात खाली जमिनीवर झोपले. या हल्ल्यामुळे सराव मध्येच थांबवण्याची वेळ आली.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई टीम एकही सामना जिंकले नाही. सूर्यकुमार यादवशिवाय टीममध्ये कोणीच जास्त धावा करू शकलं नाही. यासोबत प्ले ऑफमध्ये जाण्याच्याही आशा मावळल्या आहेत. पॉईंट टेबलवर सर्वात शेवटी 10 व्या स्थानावर मुंबई टीम आहे.
दुसरीकडे चेन्नई टीम 6 पैकी एक सामना जिंकली तर 5 पराभूत झाली आहे. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार याकडे लक्ष आहे. मुंबईने आयपीएलमध्ये 5 तर चेन्नईनं 4 ट्रॉफी जिंकल्या आहेत. मात्र यावेळी दोन्ही टीम प्लेऑफपर्यंत पोहोचतील की नाही हीच मोठी शंका आहे.