India Vs Pakistan Match: आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली असून पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान संघात आज सामना होणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तानचा संघ वर्षभरानंतर आज पुन्हा आमने सामने येणार आहेत. 2021 च्या टी 20 विश्वचषकात दोन्ही संघ शेवटचा सामना खेळले होते. या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सने विजय मिळवत टीम इंडियाचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्याचा टीम इंडियासमोर असणार आहे. या सामन्याच्या निकालाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याबाबत अंदाज बांधले जात आहेत. तत्पूर्वी सोशल मीडियावर दोन्ही संघांचे चाहते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. असं असताना टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वसिम जाफरनं एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसिम जाफरने दोन लहान मुलं भांडत असल्याचं व्हिडीओ शेअर केला आहे. तर एक मोठी व्यक्ती त्या दोघांना तसं करण्यापासून रोखत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना वसिम जाफरनं लिहिलं आहे की, "आज भारत-पाकिस्तान संघाच्या चाहत्यांची अशी स्थिती आहे." ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काही तासातच हजारो लोकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. तसेच हजारो लाईक्स मिळाले आहेत. 



वसिम जाफरने यापूर्वी 27 ऑगस्ट रोजी भारताच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनची निवड केली होती, ज्यामध्ये त्याने ऋषभ पंत किंवा दिनेश कार्तिक यापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय ठेवला होता. 


पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी वसीम जाफरची प्लेइंग इलेव्हन


रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक/ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.