मुंबई : अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो.तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस करावा लागतोच. या सर्व महत्वाच्या गोष्टींना अ‍ॅथलीटसना सामोरे जावे लागते. त्यात आता एका महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान केले आहे. या विधानावरून सध्या तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जातेय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेची 39 वर्षीय स्टार महिला धावपटू लोलो जोन्स हिने इन्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये तिने एक खळबळजनक खुलासा केला आहे. लोलो जोन्सचे म्हणणे आहे की, लग्नापूर्वी सेक्स न करण्याचा निर्णय घेतला आहे.या तिच्या निर्णयामूळे ती ट्रोल होतेय. 
 
लोलो जोन्सने खुलासा केला आहे की तिने विवाहपूर्व सेक्स न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तिच्या या निर्णयामुळे ट्रोल होत आहे. लोलो जोन्स ही अमेरिकेची स्टार महिला धावपटू आहे आणि ती 60 मीटर आणि 100 मीटर हर्डल्समध्ये माहिर आहे.



 पोस्टमध्ये काय ?


लोलो जोन्सने पोस्टमध्ये म्हटले की, गेल्या 8 महिन्यांपासून माझ्याशी बोलत असलेल्या व्यक्तीला मी ब्लॉक केले.ती व्यक्ती मला लग्न आणि मुलांबाबत स्वप्न दाखवत होती. जरी तो मला भेटण्यासाठी वेळ काढत नव्हता, तरी तो मला फक्त मित्राच्या चौकटीत ठेवत होता. 


जोन्स पुढे म्हणते की, मी सतत देवाकडे एक चांगला नवरा मिळावा अशी इच्छा व्यक्त करत होती. वर्षानुवर्षे माझ्यामध्ये लग्नाची इच्छा वाढत होती. मलाही एक कुटुंब हवे आहे. पण माझे हृदय मात्र तुटत होते. 
 
एक मुलगी आहे जी विवाहपूर्व लैंगिक संबंध ठेवत नाही आणि म्हातारी होत चालली आहे, अशा शब्दात अनेक पुरुष मला चिडवतात असेही तिने म्हटले आहे. जोन्सच्या लग्नापूर्वी सेक्स न करण्याच्या विधानावर तिला ट्रोल केले जातेय.