मुंबई : सध्या आयपीएलसोबत काऊंटी चॅम्पियनशिपचे सामने देखील सुरु आहेत. या काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये डरहम आणि ग्लेमोर्गन या दोन टीममध्ये सामना खेळवण्यात आला होता. दरम्यान या सामन्यात एक गंमतीदार किस्सा घडला आहे. यावेळी इंग्लंड टेस्ट टीमचा कर्णधार बेन स्टोक्स पिचवर चक्क झोपलेला दिसून आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेन स्टोक्सला झोपलेलं पाहून अनेकांच्या मनात प्रश्न आणि सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली. पिचवर झोपलेल्याचा हा बेन स्टोक्सचा व्हिडीयो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 


काय आहे नेमकं प्रकरण?


झालं असं की, ऑस्ट्रेलिया क्रिकेटर मार्नस लाबुशेनने फेकलेला बॉऊन्सर बेन स्टोक्सच्या कंबरेखाली नको त्या ठिकाणी लागला. त्यानंतर बेन अचानक पिचवर झोपला. यादरम्यान स्टोक्सला काहीच दुखापत झाली नव्हती. तरीसुद्धा त्याने काही वेळ पिचवर झोपून मैदानातील इतर खेळाडूंची मजा घेतली. मात्र स्टोक्सच्या अशा या वागण्याने मैदानातील परिस्थिती गंभीर बनली होती.



या सामन्यात बेन स्टोक्सने उत्तम फलंदाजी केली. 110 बॉल्समध्ये त्याने 85 रन्सची खेळी करत टीमला चांगला स्कोर करण्यास मदत केली. यामध्ये 8 चौकार आणि 2 सिक्सचा समावेश आहे.