बंगळुरु : IPL 2022 च्या लिलावात अनेक नव्या खेळाडूंवर मोठी लागताना दिसत आहे. या नव्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने अनेकांना प्रभावित केले आहे. त्यामुळेच त्यांच्यावर आयपीएल लिलावात देखील चांगली बोली लागताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये अनेक नव्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते. ज्यामुळे त्यांचं टॅलेंट जगासमोर येतं. असाच एक खेळाडू आहे. ज्याचं नाव आहे टीम डेव्हिड. 6 फूट 5 इंच उंचीचा हा खेळाडू सिंगापूरकडून खेळतो. त्याच्यासाठी अनेक संघांनी बोली लावली. पण अखेर मुंबई इंडियन्सने त्याला 8.25 कोटी रुपयात खरेदी केले आहे.


याआधी तो रॉयल चॅलेंज बंगळुरुकडून खेळत होता. टीम डेव्हिडचा जन्म 16 मार्च 1996 रोजी सिंगापूरमध्ये झाला. 1990 मध्ये त्यांचे कुटुंब ऑस्ट्रेलियातून सिंगापूरला स्थायिक झाले होते. त्यानंतर टीम डेव्हिडने सिंगापूर राष्ट्रीय संघात खेळायला सुरुवात केली.


आयपीएलमध्ये खेळणारा तो सिंगापूरचा पहिला खेळाडू आहे. पण त्याला मागच्या सीजनमध्ये एकच सामना खेळण्याची संधी मिळाली होती. 


टीम डेव्हिडन सिंगापूरकडून 14 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 558 रन केले आहेत. त्याच्या नावावर 4 अर्धशतके देखील आहेत. सध्या तो ऑस्ट्रेलिया संघात देखील संधी शोधत आहे.